निलीमा चव्हाणच्या संशयित मृत्यूबाबत लवकरात लवकर तपास व्हावा – चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस

Spread the love

चिपळूण,03 ऑगस्ट- चिपळूण तालुक्यातील कु. निलिमा सुधाकर चव्हाण ही सर्वसामान्य कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दापोलीच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करीत होती. दिनांक २९ जुलै २०२३ रोजी दापोली येथुन गावी येत असताना ती अचानक बेपत्ता झाली होती. ब-याच ठिकाणी कुटुंबीयांनी तपास केला, सोशल मिडीयावरही बातम्या दिल्या गेल्या. मात्र,मंगळवार दि. १ ऑगस्ट रोजी तिचा मृतदेह दाभोळ खाडीत आढळून आला. तिच्या मृतदेहाची अत्यंत क्रुरपणे विटंबना करण्यात आली होती. ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना आहे.

निलीमा चव्हाण हिचा मृतदेह आढळूण आल्यानंतर तालुक्यासह संपुर्ण जिल्हयामध्ये खळबळ उडाली आहे. या हत्याकांडाचा जलद गतीने तपास करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी चिपळूण तालुका राष्ट्रावादी काँगेस पार्टी, युवक, युवती, महिला, विद्यार्थी व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम प्रदेश महिला सरचिटणीस दिशा दाभोळकर, विधानसभा अध्यक्ष दादा साळवी, माजी पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, प्रदेश युवक उपाध्यक्ष डॉ.राकेश चाळके, माजी सभापती पूजा निकम, युवक अध्यक्ष निलेश कदम, महिला अध्यक्ष जागृती शिंदे, दशरथ दाभोळकर, उपसरपंच गजानन महाडिक, ओवी शेट्ये, रशिदा चौघुले, राजेश सुतार, उस्मान सय्यद, इकबाल मुल्ला, दिनेश शिंदे, पुनम भोजने, विकास गुरव, सनी आयरे, बाबू आयरे, बशीरभाई चिकटे, विनायक पाटेकर, पप्या पालकर, सचिन शिंदे, रियाज खेरटकर, मुस्कान अडरेकर, अतुल शिंदे, सचिन कदम, अमोल कदम, पंकज कदम, सुशांत सुर्वे, वैभव चव्हाण, दीपक पवार, सचिन शिंदे, सईद बोदले, गणेश भुरण, सचिन भोजने आदि मान्यवर उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page