मुंबई : राज्यातील लोकप्रतिनिधींना आता ४० मजली आमदार निवास मिळणार आहे. याचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते. यावेळी नार्वेकरांनी या आमदार निवासाची वैशिष्ट्ये सांगितली.
नार्वेकर म्हणाले, राज्यात आमदारांच्या राहण्याची व्यवस्थित व्यवस्था नव्हती त्यामुळं नवं ‘मनोरा’ आमदार निवास बनवण्यात येणार आहे. यासाठी ४० आणि २८ अशा दोन मजली इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये ३६८ निवासी अपार्टमेंट असणार आहेत. तसेच प्रत्येत अपार्टमेंट हे १ हजार स्केअर फुटांचं असेल.
हे आमदार निवास विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज असणार आहे. यामध्ये ८५० गाड्यांसाठी पार्किंग, कल्ब हाऊस, जिम्नॅशिअम, कॉन्फरन्स हॉल, रेस्तराँ अशा अनेक अत्याधुनिक सुविधा या आमदार निवासामध्ये असणार आहे. यामुळं सर्व आमदारांना एकाच ठिकाणी राहता येणं शक्य होणार आहे.