“लोकमान्य टिळक पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा कारण…” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीने जिंकली पुणेकरांची मनं..

Spread the love

पुणे: महारष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करताच पुणेकरांनी टाळ्या वाजवत कौतुक केलं. लोकमान्य टिळक पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. पुण्याच्या पुण्यभूमीत येण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. पुणे ही टिळक, फुले, चाफेकर या वीरांची भूमी आहे. लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak Award) पुरस्कार स्विकारताना मला आनंद होत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांचं स्वागत पुणेरी पगडी, सन्मानपत्र आणि भेट देऊन करण्यात आलं. मोदींनीही यावेळी मराठीतून जनसागराशी संवाद साधत कार्यक्रमात अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. मोदी म्हणाले, हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव आहे. एखादा पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा जबाबादारी देखील वाढते. हा पुरस्कार मी १४० कोटी देशवासीयांना समर्पीत करतो.

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांचं स्वागत पुणेरी पगडी भेट देऊन करण्यात आलं. मोदींनीही यावेळी मराठीतून जनसागराशी संवाद साधत कार्यक्रमात अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.

ज्यांच्या नावात साक्षात गंगा नदीचे नाव आहे. अशा पुरस्काराची रक्कम मी नमामि गंगा या प्रोजेक्टला देण्याचा निर्णय घेतला आहे. देशात पुणे आणि काशीला विशेष महत्त्व आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला वेगळे वळण दिले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page