पूरग्रस्त भागाच्या पाहणी सह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार
रत्नागिरी (प्रतिनिधी) : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून पूरग्रस्त भागाच्या पाहणी सह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, २९ जुलै २०२३ रोजी पहाटे ४.४५ वाजता कोकण कन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी ५.१५ वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी ७.३० वाजता चांदेराई, रत्नागिरी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी. सकाळी ९.०० वाजता जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निमंत्रित सदस्यांसमवेत चर्चा स्थळ : (शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी). सकाळी ९.४५ वाजता कै. अॅड. चंद्रकांत काशिनाथ तथा बापूसाहेब परुळेकर यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट (स्थळ : सावरकर चौक, रत्नागिरी)
सकाळी १०.०० वाजता म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन व युनिट, रत्नागिरी नगरपरिषद आयोजित मेळाव्यास उपस्थिती (स्थळ : दत्त मंगल कार्यालय, पहिला मजला, डॉ. बा. ना. सावंत रोड, रत्नागिरी) सकाळी ११.०० वाजता रत्नागिरी जिल्हा नियोजन व विकास समिती बैठक (स्थळ : अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, आवार, रत्नागिरी) दुपारी १ वाजता जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत योजनेच्या कामांचा आढावा. (स्थळ : अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी) दुपारी १.३० वाजता रत्नागिरी जिल्हा डोंगरी विभाग विकास समिती बैठक (स्थळ : अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, आवार, रत्नागिरी). दुपारी २.०० वाजता पत्रकार परिषद (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) दुपारी २.३० वाजता भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ फूटी ध्वजस्तंभ उभारणे व ३ डी मॅपींग मल्टीमीडिया शो व इतर कामांचा आढावा (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी).
दुपारी ३ वाजता मौजे गोठणे, ता. संगमेश्वर येथील प्रकल्पग्रस्तांचे संकलन अद्यावत करणेबाबत बैठक (स्थळ:जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी ३.३० वाजता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा रत्नागिरी आयोजित अभिनय कार्यशाळेस सदिच्छा भेट. (स्थळ : राधाबाई शेट्ये सभागृह, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) दुपारी ४ वाजता राहुल पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनपर भेट (स्थळ खालची आळी, रत्नागिरी). सायंकाळी ४.३० वाजता गणपतीपुळे येथील समुद्राच्या लाटांनी नुकसान झालेल्या व्यावसायिकांना श्री रत्नागिरीचा राजा मंडळाच्यावतीने मदत वाटप कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी). सायंकाळी ५ वाजता समीर इंदुलकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट (स्थळ : ७०७, रमेशनगर, नाचणे, साळवी स्टॉप ते नाचणे लिंक रोड). रात्री सोईनुसार रत्नागिरी येथून मोटारीने अलिबाग, जि.रायगडकडे प्रयाण.