रत्नागिरी : रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर केर्ली येथे पाणी आले आहे. वाहतूक एका बाजूने संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यात पाऊस कायम आहे. विशेषतः धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे.यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज शुक्रवारी सकाळी ८ वाजता राजाराम बंधाऱ्याजवळची पाणी पातळी ४१ फुटांवर पोहोचली. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट आणि धोका पातळी ४३ फूट आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ७० बंधारे पाण्याखाली गेले आहेत.