
चिपळूण :- पोसरे बौद्धवाडी येथे ८ फुटी अजगर घरात आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार पोसरे बौद्धवाडी येथील संदिप गमरे यांच्या घराच्या मागील बाजुस गुरुवारी रात्री १०:३० वाजता अजगर आढळुन आला.
घरामध्ये अजगर आढळल्याची बातमी वा-यासारखी पसरली. आणि बघ्यांची एकच गर्दी झाली. गमरे यांनी क्षणाचाही विलंब न करता वल्ड फॉर नेचर संस्थेच्या सर्पमित्रांना कळवीले. माहिती मिळताच संस्थेचे सर्पमित्र प्रथमेश पवार व तुषार गमरे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्या अजगरास त्वरीत सुरक्षित पकडले.
पोसरे हे गाव दुर्गम व जंगली भागात असल्याने येथे ,सापांसह वेगवेगळे प्राणी आढळतात.
अजगर पकडतेवेळी वल्ड फॉर नेचर संस्थेचे जिल्ह्याध्यक्ष प्रथमेश पवार, तुषार गमरे ,श्री विकास पवार,श्रुतीक कदम,संदीप गमरे,आम्रपाली गमरे,प्रशिका गमरे आदी उपस्थित होते. व अजगरास निसर्गात मुक्त करताना. सर्पमित्र प्रथमेश पवार,तुषार गमरे, श्रुतीक कदम,प्रसन्न खेडेकर,योगेश मोहिते. आदी उपस्थित होते.
तसेच संस्थेच्या वतीने असे आवाहन करण्यात आले आहे की,कधीही कोठेही , साप, मगर,किंवा कोणताही वन्यजीव आढळून आल्यास त्वरीत वल्ड फॉर नेचर रत्नागिरी संस्थेच्या २४तास हेल्पलाईन क्रमांक ९३५६११८४३८,९८३४६६५९१६,९५२७४१५५६० यांवर किंवा वनविभाग महाराष्ट्र शासन यांच्या १९२६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे