
संगमेश्वर ; सध्या कोकणासह संपूर्ण राज्यात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात होत आहे.यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाच प्रकारच्या जमीन व रस्त्याला भेगा साखरपा गोवरेवाडीला जाणाऱ्या मार्गाला पडल्या असल्याने हा मार्ग पावसाळा सुरु झाल्यापासून बंद आहे. पण या भेगा पडण्याचे कारण मानवनिर्मित असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणेआहे. मिऱ्या नागपूर चौपादरीकरण काम वेगात सुरु आहे. या वेळी कोणत्याही भौगोलिक परिस्थितीचा आढावा न घेता माती वापरासाठी येथील डोंगराचे मोठ्या प्रमाणात खोदाई केल्यामुळे भेगा पडल्या आहेत.
यामुळे गोवरेवाडी ग्रामस्थांची वाट बंद झाली असून शालेय विद्यार्थी, आजारी माणसं यांना त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे लांजा राजापूर साखरपा आमदार राजन साळवी यांनी या भागाची पाहणी केली. त्यांच्या समवेत ठेकेदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी त्यांना यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे सूचना केल्या. यावेळी आमदार राजन साळवी यांच्यासोबत माजी सभापती जया माने, काका कोलते, शेखर आकटे,सरपंच रुचिता जाधव, राजा वाघधरे, दत्ता वाघधरे,योजना लोटनकर, रामभाऊ गोवरे, सुमित वाघधरे,संजय पाष्टे, दीपक गोवरे, पांडू गोवरे, आदी गोवरे वाडी मधील ग्रामस्थ उपस्थित होते.