
संगमेश्वर :- देवरुख महाविद्यालयाच्या गेटसमोरील धोकादायक झालेली पाण्याची टाकी नियोजनपूर्वक सोमवारी सायंकाळी जमीनदोस्त करण्यात आली .
४३ वर्षे या टाकीतून पाणीपुरवठा सुरू होता . देवरुख ग्रामपंचायत असताना १९८३ साली ही नळपाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली . त्यावेळी देवरुख महाविद्यालय मार्गावर ही टाकी बांधण्यात आली होती . तीन वर्षांपूर्वी ही टाकी धोकादायक असल्याचे नगरपंचायतीने जाहीर केले होते . देवरुख नगरपंचायतीकडून नवीन नळपाणी योजनेचे काम हाती घेण्यात येणार आहे . नवीन टाकी उभारण्यासाठी ही जुनी टाकी नगरपंचायतीकडून पाडण्यात आली .