ठाणे :- २० जुलै रोजी भाजपचे रोहिदास मुंडे दिव्यातील वाढत्या अनधिकृत बांधकाम विरोधात मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी ठाण्यात मुख्यमंत्री निवासस्थाना जवळ धरणे आंदोलन करणार आहेत. या धरणे आंदोलनासाठी पालिका प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी असे पत्र रोहिदास मुंडे यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.
दिवा शहर बकाल करणाऱ्या अनधिकृत बांधकामाचा अल्बम रोहिदास मुंडे यांनी नुकताच पालिका आयुक्तांना दिला होता. वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ भाजपचे रोहिदास मुंडे हे सदर वाढत्या अनधिकृत बांधकामाकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या ठाण्यातील निवासस्थाना जवळ धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी पालिकेने रस्त्यालगत जागा उपलब्ध करून द्यावी असे पत्र रोहिदास मुंडे यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.