सावंतवाडी/प्रतिनिधी:- सावंतवाडी येथील मोती तलावात बुडणाऱ्या वृद्ध महिलेला सावंतवाडी पोलिसांसह माजी नगरसेवकांना वाचवण्यात यश आले आहे. ही घटना आज सकाळी न्यायालयाच्या आवारात घडली. माजी नगरसेवक सुरेश भोगटे पोलीस कर्मचारी प्रवीण वालवालकर जगदीश दूधवाडकर यांनी आपला जीवावर बेतून तिला वाचविले. शोभा आत्माराम नाईक रा. खासकीलवाड असे तिचे नाव असून तिला अधिक उपचारसाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळी एक वयोवृद्ध महिला तलावाच्या पाण्यामध्ये पडून झाडाच्या फांदीला पकडून जीव वाचवण्यासाठी मदतीसाठी हात उंचावत होती. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी फिरत असताना येथील नागरिकांना दिसून आली नागरिकांनी प्रसंग ओळखून धावाधाव करून तलावातील होडीच्या साह्याने तिला पाण्यातून बाहेर काढून वाचवण्यात आली.त्याप्रसंगी मॉर्निंग वॉक साठी आलेले पोलीस नाईक तसेच माजी नगरसेवक सुरेश भोगटे, अजय मांजरेकर, संजय मापसेकर, रवी मडगावकर, प्रल्हाद तावडे, राऊळ, इतर नागरिकांनी वाचवण्यासाठी धावपळ करून अखेर तिला पाण्यातून बाहेर काढण्यास पोलिसांचं माजी नगरसेवकाला यश आले असून त्यांनी तिला उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल केले आहे.