मुंबई, ठाणे, नवी मुंबई,पालघर, विरार येथील दहीहंडी उत्सव मंडळानी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Spread the love

ठाणे : महाराष्ट्र राज्यात यावर्षी साजरा होणारा दहीहंडी उत्सव व समस्त तरुण वर्ग व बाळगोपांचा आवडता सण आहे समस्त बालगोपाळांच्या कौशल्याने मुले व त्यांच्या उंच थरामुळे सदर उत्सवाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात येतात सदर उत्सवा दरम्यान गोविंदा पथकांना दिलासा मिळावा.

■ बालगोपाळांचा विमा गेल्या वर्षी आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे विमा उतरवला होता यावर्षी सुद्धा समस्त बालगोपांचा विमा महाराष्ट्र शासनातर्फे उतरवण्यात यावा.

■ दहीहंडी यास साहसी खेळाचा दर्जा महाराष्ट्र शासनाने दिला आहे. परंतु याबाबत शासनाकडून पुढे काही उपाययोजना झाल्या नाही तरी सदर साहसी खेळासाठी आपण पुढाकार घेऊन महाराष्ट्र शासन व दहीहंडी पथक यांच्या समन्वय साधून या साहसी खेळासाठी स्पर्धा आयोजन कराव्यात.

■ दहीहंडी आयोजन करण्यासाठी आयोजकांवर काही जाचक अटी आहेत त्याबाबत थोडी शिथिलता आणावी.

■ दहीहंडी उत्सवासाठी महाराष्ट्रातील समस्त गोविंदा पथक जवळजवळ महिना/ दीड महिना सराव करतात परंतु वेळेअभावी त्यांचे कौशल्य हे जास्तीत जास्त ४ ते ५ दहीहंडी आयोजनाखाली दाखवू शकतात. तरी सदर उत्सवाची वेळ आपण रात्री १२.०० पर्यंत केल्यास सर्व गोविंदा पथक हे जास्तीत जास्त दहीहंडीखाली पोहोचू शकतील.५) महाराष्ट्र शासनातर्फे गोपालकाला या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी.

पहा सविस्तर व्हिडिओ….

■ गोविंदा पथक व आयोजक यांच्यावर असलेले गुन्हे मागे घेण्यात यावे. या सर्व विषयांवरती चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री अजित दादा पवार साहेब यांची देवगिरी बंगला येथे मुंबई,ठाणे,पालघर येथील सर्व गोविंदा पथकाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली त्याप्रसंगी ठाणे शहर जि.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आनंद परांजपे, मुंबई विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, गोविंदा पथकाचे प्रमुख पदाधिकारी अरुण पाटील, कमलेश भोईर, संदीप ढवळे, समीर पेंढारे, निलेश वैती, रोहिदास मुंडे, नितीन पाटील, रवींद्र पालव,संदीप पाटील,किरण जमखंडिकर,अतुल माने, मनोहर सालावकर,राहुल पवार,विवेक कोचरेकर,आप्पा जाधव,नागेश पवार आदी मोठ्या संख्येने बालगोपाळ उपस्थित होते.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page