✒️ जनशक्तीचा दबाव न्यूज
🛑 सातारा | जानेवारी ३०, २०२३.
◼️ साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याजवळ गोकर्ण महाबळेश्वरवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. झालेल्या अपघातमध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
◼️ विशेष म्हणजे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्यालगत असणाऱ्या कठड्याला धडकली. या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी भुईंज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या शिरवळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात इनोव्हामधील २ महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
◼️ रंजना सराफ आणि शांताबाई जाधव अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. तर कारमधील इतर 6 जण जखमी झाले आहेत. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार रस्त्यालगत असणाऱ्या कठड्याला धडकली. या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीसांनी घटनास्थळावरून तात्काळ जखमींना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.