
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राज ठाकरे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्याकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात येतो का? ते पाहणं महत्त्वाचं होतं. असं असताना आज राज ठाकरे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले आहेत..