रत्नागिरी :- तालुक्यातील शिरगाव आडी येथे शाळेवर झाड कोसळले , विद्यार्थी जखमी

Spread the love

रत्नागिरी :- तालुक्यातील शिरगाव आडी येथे प्राथामिक शाळेवर झाड पडून शाळेतील कौले पडल्याने एक विद्यार्थी जखमी झाला तर अन्य विद्यार्थी बालंबाल बचावल्याची घटना बुधवारी दुपारी घडली .
आडी येथील शाळेमध्ये दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शाळा सुरू असताना अचानक झाड कोसळले . यावेळी झाड पडताना मोठा आवाज झाला . त्यामुळे सर्वच घाबरले होते . यावेळी झाडाचा शेंडा शाळेच्या कौलांवर पडल्याने , कौले फुटून पडली . यात पुर्वेश दिनेश पालकर याच्या डोक्यात कौल पडल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली . अन्य नऊ मुले बालंबाल बचावली . यावेळी शाळेत शिक्षक व पालकवर्गही उपस्थित होता . या घटनेमधून तेही बचावले .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page