मुंबई :- गेल्या चार वर्षात महाराष्ट्रातल्या जनतेने अनेक राजकीय भूकंप पाहिले आहेत.आता हेच पहायचं बाकी होतं की काय असं म्हणत राष्ट्रवादी पक्षाचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटासोबत सरकार स्थापन केले आहे. त्यांनी इतर आमदारांसह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही मोठी फूट पडली असून अजित पवार यांनी आपल्या विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा दिला असून शिंदे भाजप सरकारमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रासाठी हा शिवसेना फुटीनंतरचा मोठा राजकीय धक्का मानला जातोय. इंटरनेटवर सुद्धा लोकांनी धुमाकूळ घातलाय. ट्विटर महाराष्ट्रातला राजकीय भूकंप प्रचंड व्हायरल होतोय. या घटनेवर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत.
तर काही लोकांनी आपला लोकशाही वरचा विश्वास उडाला असून आम्ही मदतान कार्डाचाच राजिनामा देतो असे म्हटले आहे.
तर राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना मंत्रीपद मिळाल्याने त्यांच्यावरही जोरदार मिम्स शेअर केले जात आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्यांवर बोलत आहेत. पण मुश्रीफजी मंत्री झाल्याने भाजप, राष्ट्रवादीतील अजित पवार गटाची युती झाली आहे. त्यामुळं किरीट सोमय्या आता कागलच्या उरूसाला येणार असेही म्हटले जात आहे.