आरोग्य केंद्रामधील रुग्ण संख्या ज्यावेळी कमी होईल त्यावेळी आरोग्य सेवा घरा घरा पोचली असेल:- ना.उदयजी सामंत.
संगमेश्वर,मकरंद सुर्वे संगमेश्वर
राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज आरोग्य वर्धिनी केंद्र बुरंबीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मोठया उत्साहात सपन्न झाला.
. आरोग्याच्या दृष्ठिने महत्वाचे असलेले आरोग्य वर्धिनी केंद्र याचे आज उदघाट्न करुन जनतेसाठी तो खुला करण्यात आला आहे.आरोग्य केंद्रामधील रुग्ण संख्या ज्यावेळी कमी होईल त्यावेळी आरोग्य सेवा घरा घरा पोचली असेल असे प्रतिपादन पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी केले आहे.आपल्या आरोग्यची काळजी घेण्याचे आहवान पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी केले आहे.
यावेळी संगमेश्वर चिपळूणचे आमदार शेखर निकम,माजी आमदार सदानंद चव्हाण,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा प्रमुक राहुल पंडित,उपजिल्हाप्रमुक राजेश मुकादम,रत्नागिरी तालूका प्रमुख बाबू म्हाप,संगमेश्वर तालुक प्रमुख प्रमोद पवार,माधवी गिते,गटविकास अधिकारी भरत चौगुले,जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठले,तालूका आरोग्य अधिकारी ,आदी पदाधिकारी उपस्थित होते.