संगमेश्वर- निम्मा जून महिना उलटून गेला तरी मृगाच्या पावसाचा अद्यापही थांगपत्ता न्हवता. शेतकरी चिंतेत असल्याने शेतीची कामे करणे अवघड झाले होते. पण अचानक आलेल्या पावसामुळे सर्व शेतकऱ्यांचे चेहरे आनंदमय झाले आहेत आता लवकर शेतीला सुरवात करण्याचा अंदाज देत शेतकरी मोठ्या उत्साहात शेती करणार…
जून महिना उलटून गेला तरी पावसाचा थांगपत्ता न्हवता. सुकलेल्या जमिनीचे भेग शेतकऱ्यांच्या डोळ्यांचे अश्रू बनले होते शेतीची सर्वच कामे थांबलेली होती पण अचानक आलेल्या पावसामुळे गावोगावी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेतीला सुरवात झालेली दिसते. पावसावर अवलंबून असलेला हा शेतकरी तब्बल एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आपल्या शेतीला पाणी लागले या आशेने अति उत्साहित होता. या अचानक आलेल्या पावसामुळे कोरडा पडलेला निसर्ग सुद्धा हिरवागार दिसू लागला...
दरम्यान पावसामुळे नागरिकांची उकड्यापासून सुटका झाली आहे. भारतातील शेती ही पावसावर अवलंबुन आहे. आणि या अंदाजाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
काही भागात सामान्यापेक्षा अधिक पाऊसाची शक्यता तर काही भागात सामान्यापेक्षा कमी पावसाची शक्यता आहे..!
तुषार गोरे - संगमेश्वर