दिवा : प्रतिनिधी ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. या कामासाठी निविदा काढली जाते. नालेसफाईच्या कामात सत्ताधारी, मनपा प्रशासन, ठेकेदार संगनमताने लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला जातो ह्याचे उत्तम उदाहरण. दिव्यातील जय अंबिका नगरातील, लक्ष्मण वाडी, साईनाथ नगर, सुदीक्षा हाईट्स,साई कृपा चाळ, येथील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची आवरणे अनेक ठिकाणी अद्याप लावण्यात आलेली नाहीत, तसेच अतीवृष्टीमुळे या भागात पाणी साचते, सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारींचीही अवस्था तशीच आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होऊन सुद्धा ह्या परिसरातील नालेसफाई व गटारावरील आवरणे (झाकणे ) पालिका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही लावलेली नाहीत,
ठाणे महानगर पालिका हलगर्जी पणा करीत असल्याचे दिसून येत आहे, भविष्यात जय अंबिका नगर मध्ये सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारात पडून एखादी जीवित हानी झाल्यास पालिका प्रशासन अधिकाऱ्यां विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला जाईल, असा इशारा शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उप.शहर संघटक सौ.योगिता हेमंत नाईक यांनी दिला आहे.
काय म्हणाल्या सौ.योगिता हेमंत नाईक पाहूया सविस्तर
जाहिरात