
रत्नागिरी : काल दि. 28 जुलै रोजी रत्नागिरी तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी तालुक्यातील शिरगांव मधील गायवाडी येथील रहिवासी श्री. गजानन वसंत सनगरे ह्यांच्या घरालगत रस्त्याच्या बाजूला असलेली पंचायत समिती ने बांधलेली चिरेबंदी भिंत कोसळली व त्यामुळे सुमारे ₹ 1,50,000/- चे नुकसान झाले. सुदैवाने ह्या नुकसानामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर घटना घडताच श्री. दीपक मोरे ह्यांनी ही बाब रत्नसिंधू योजनेचे सदस्य श्री. किरणशेठ सामंत व राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी ह्यांच्या कानावर घातली. सदर बाब ऐकताच मा. किरणशेठ सामंत ह्यांनी त्वरित अधिकाऱ्यांना विनंती करत पंच यादी करून घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी तात्काळ जिल्हा वार्षिक योजना सन 2023-2024 अतिवृष्टी कार्यक्रमांतर्गत प्राधान्याने ही भिंत बांधण्यासाठी ₹ 10 लाख एवढी रक्कम मंजूर् केली. त्यामुळे भविष्यात अश्या प्रकारच्या दुर्घटनांना आळा बसणार आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर तात्काळ मदत जाहीर केल्याबद्दल शिरगांव गायवाडीतील ग्रामस्थांनी मा. किरणशेठ सामंत आणि ना. उदयजी सामंत ह्यांचे आभार व्यक्त केले.