राजापूर :- शहराला पाणीपुरवठा करणारे कोदवली धरण पावसामुळे तुडुंब भरल्याने आता शहरातील सर्व भागातील पाणीपुरवठा पूर्ववत नियमीत करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली.
मार्च महिन्यात कोदवली धरणात खडखडाट झाला हाेता. केवळ शीळ जॅकवेलवरच शहराचा पाणीपुरठा अवलंबून होता. आता पावसामुळे कोदवली धरणात पाणीसाठा झाला आहे.