रायगड : रायगड जिल्ह्यात पोलादपूरजवळ काही मिनिटांपूर्वी पुन्हा मोठी दरड कोसळल्याने खळबळ उडाली आहे. आंबेनळी घाटाजवळ प्रतापगडाच्या पायथ्याजवळ पोलादपूर हद्दीत मोठी दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळातच पोलादपूर प्रशासनाची टीम पोहोचली आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळली आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.