
दिवा ; मंगळवारी काही मिनिटे बरसलेल्या मोसमी पावसाचे पाणी ठाणे पालिका हद्दीतील दिवा शहरातील धर्मवीरनगर भागातील टाटा पॉवर लाईन रोड परिसरातील चाळींमध्ये साचल्याचे दिसूनआले. ते पाणी बाहेर काढण्यासाठी रहिवाशांनीच कंबर कसत साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली. कडक उन्हामुळे त्रस्त झाल्याने, पावसाची आतुरतेने प्रतिक्षा करत असलेल्या ठाणेकरांची प्रतिक्षा
मंगळवारपासून सुरु झालेल्या यावर्षीच्या मोसमी पावसामुळे संपुष्टात आली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण
झाल्याने एकीकडे ठाणेकर नागरिकांनी सुटके निःश्वास टाकला असतानाच दुसरीकडे दिव्यातील धर्मवीरनगर टाटा पॉवर
लाईन रोड प्रेरणा टॉवर, येथील चाळींमध्ये पाणी शिरल्याची घटना समोर आली आहे. ठाणे पालिकेने नालेसफाईसाठी करोडो रुपयांचा निधी खर्च करुन देखील पावसाचे पाणी साचल्याच्या या घटनेमुळे दिव्यातील नालेसफाई व्यवस्थित झाली नसल्याचे
उघड झाले. यामध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप समाजसेवक अमोल केंद्रे यांनी केला आहे.
पोलखोल ; पहा विडिओ सविस्तर
जाहिरात
