
दातीवली :जय हनुमान मंदिर दातीवली येथे उभारण्यात आलेल्या सुसज्ज व्यायाम शाळेचे उद्घाटन शिवसेना दिवा शहर प्रमुख व माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दातिवली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दातिवली गावातील ग्रामस्थांसाठी ठाणे महानगर पालिके मार्फत जय हनुमान मंदिर येथे सुसज्ज व्यायाम शाळा उभारण्यात आली आहे. या व्यायाम शाळेचा उपयोग दातिवली गाव व परिसरातील तरुणांना होणार आहे. सदर व्यायाम शाळेचे उद्घाटन मंगळवारी रमाकांत मढवी यांच्या हस्ते करण्यात आले.
जाहिरात
