दापोलीतील आर.जी.पवार हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे शाळेसाठी योगदान..

Spread the love

मुंबई – (प्रसाद महाडीक /शांताराम गुडेकर) दापोलीतील आर. जी. पवार हायस्कूल माटवण शाळेच्या इयत्ता दहावीच्या १९९२ बॅचने नुकतीच शाळेला सदिच्छा भेट दिली.२०१८साली शाळा सोडल्याला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १९९२ बॅचचे सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र आले आणि तेव्हापासून दरवर्षी ते शाळेला भेट देत आहेत. या बॅचने आतापर्यंत शाळेला अनेक प्रकारे मदत केलेली आहे. मग शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान असेल, तालुकास्तरीय मॅटवरील कबड्डी स्पर्धा असेल, विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचा वर्षभराचा शैक्षणिक खर्च करणे असेल आणि शाळेसाठी लागणारे फर्निचर असेल, विविध प्रकारे त्यांनी शाळेला हातभार लावलेला आहे. यावर्षी देखील प्रत्येक वर्गातील अँड्रॉइड टेलिव्हिजनला डिजिटल अभ्यासक्रमाचे अंदाजे २५ ते ३० हजार रुपये किमतीचे पेन ड्राईव्ह त्यांनी शाळेला भेट स्वरूपात दिले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला वह्या, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव श्रीराम महाडिक, शालेय समिती अध्यक्ष महेश पवार, संचालक उदय महाडिक, रवींद्र सुतार, शाळेचे माजी मुख्याध्यापक तसेच १९९२ चे तत्कालीन वर्गशिक्षक गिरीश पाटील, शाळेचे मुख्याध्यापक कोंडीकिरे सर व सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.

ग्रामीण भागातील या शाळेला अशा प्रकारच्या मदतीमुळे शिक्षण क्षेत्रात एक वेगळीच चालना मिळेल याबाबत शंका नाही. गेले सहा वर्षे या बॅचने दरवर्षी सदिच्छा भेट देऊन आतापर्यंत लाखो रुपयांचे सहाय्य शाळेला व संस्थेला केले आहे. शाळेच्या आजी आणि माजी विद्यार्थ्यांसाठी या बॅचने एक आदर्श निर्माण केला आहे. शाळा तसेच संस्थेने १९९२ बॅचच्या या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page