
प्रतिनिधी : १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज भारताच्या वन डे व कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघ येथे दोन कसोटी, तीन वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
BCCI शुक्रवारी वन डे व कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केले. यशस्वी जैस्वाल व ऋतुराज गायकवाड यांच्यासह मुकेश कुमार, नवदीप सैनी यांची कसोटी संघात एन्ट्री झाली आहे. WTC Final मधून भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेकडे पुन्हा उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चेतेश्वर पुजाराला डच्चू दिला गेलाय. वन डे संघात संजू सॅमसन व ऋतुराज परतले आहेत.

भारताचा कसोटी संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नौदीप सैनी
भारताचा वन डे संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक, मुकेश कुमार