रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील आरे येथील जलस्वराज्य विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता त्यामुळे या विहिरीचा गाळ उपसा व्हावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य आशिष कनगुटकर यांनी पाठपुरावा केला होता त्याची दखल घेत काळबादेवी ग्रामपंचायतने या विहिरीतील गाळ उपसला त्यामुळे गावकऱ्यांची मोठी सोय झाली ही कामगिरी यशस्वी पार पडल्याबद्दल ग्रामसेविका कीर्ती सावंत तसेच काळबादेवी ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे गावकऱ्यांकडून आभार मानण्यात येत आहेत