टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी रविवारी (दि.१८) उत्तर अटलांटिक महासागराच्या खोलवर गेलेल्या पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर येत आहे.याबाबत यूएस कोस्ट गार्ड रिअर ऍडमी. जॉन मॅगर यांनी गुरुवारी (दि.२२) सांगितले. हे पाचही अब्जाधीश ओशियन गेट या पर्यटन कंपनीच्या पाणबुडीमधून गेले होते
माहितीनूसार,ओशियन गेटच्या पानबुडीतून एकूण ५ पर्यटक रविवारी (दि.१८) टायटॅनिक
जहाज पहायला गेलेले होते. सोमवारी (दि. १९) ही पानबुडी पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली. तटरक्षक दल या पानबुडीचा शोध घेत होते. तब्बल चार दिवस होऊनही ही पानबुडी अद्याप सापडलेली नाही. तसेच याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. मात्र गुरुवारी सकाळी बेपत्ता जहाजाबाबत एक मोठी माहिती समोर आली. या पानबुडीतील ऑक्सिजनचा साठा संपला आहे. टायटॅनिक जहाजाजवळ बेपत्ता पानबुडीचे काही अवशेष सापडलेले आहेत. त्यानंतर यूएस कोस्ट गार्ड रिअर ऍडमी. जॉन मॅगर यांनी गुरुवारी (दि.२२) सांगितले की, या पाचही अब्जाधीशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.पाणबुडीतील दुर्दैवी पाचजणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, ब्रिटिश अब्जाधीश हमिश हार्डिंग (वय ५८), पाकिस्तानी टायकून शहजादा दाऊद (वय ४८) आणि त्यांचा मुलगा (वय १९) यांचा समावेश आहे. याचबरोबर एक पायलट आणि एक कंटेंट एक्सपर्ट यांचा समावेश आहे.
टायटॅनिक जहाजाचे बुडालेले अवशेष दाखवण्यासाठी गेलेल्या पाणबुडीची जबाबदारी पोलर प्रिन्स नावाच्या जहाजाने घेतली आहे. पोलर प्रिन्स जहाजाने टायटन पाणबुडीला उत्तर अटलांटिक महासागरात नेले. यानंतर टायटॅनिकच्या अवशेषापर्यंत पोहोचल्यावर पाणबुडी पाण्यात उतरवली जाते. या पाणबुडीत एकावेळी फक्त चार ते पाच प्रवासी बसतात. यानंतर, पाणबुडी 4000 मीटर खोलीवर पडलेल्या टायटॅनिकच्या अवशेषासाठी रवाना झाली. पोलर प्रिन्स जहाज टायटन पाणबुडीच्या संपूर्ण प्रवासासाठी कमांड आणि कंट्रोल स्टेशन म्हणून काम करते.