खेड : खेड येथे नवीन बसस्थानक नियोजित जागेवर सुरू न झाल्यास जनआंदोलन करणार असल्याचे जल फाऊंडेशन कोकण विभाग यांनी एस. टी महामंडळाला निवेदन दिले आहे.
खेड बसस्थानक उभारण्यासाठी राज्य सरकारने जागा संपादित करून महामंडळाला मालकीची जागा देण्यात आली आहे. मात्र, तरी देखील भाडयाच्या जागेत आणि प्रवाशांच्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतेल अशा परिस्थितीत चालू ठेवण्याचा हा अट्टहास कशासाठी सुरू आहे, हे कळत नाही. मी स्वतः या अगोदर ही राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयात पत्रव्यवहार केला होता..
या संदर्भात त्यांनी निवेदनात म्हंटले आहे की, रत्नागिरी जिल्हयातील खेड बसस्थानक हे महत्वाचे आणि वर्दळीचे ठिकाण आहे. सध्याचे बसस्थानक बाजारपेठ परिसरात असल्याने व रस्ते अरूंद असल्याने बस गाडया स्थानकात ने आण करणे खूपच अवघड होत आहे. त्यातच या बसस्थानक परिसरात जागा कमी असल्याने अनेकदा गाडया उभ्या करण्यासाठी बस स्थानकात प्रवेश करणाच्या प्रतीक्षेत रस्त्यात उभ्या असतात व वाहतुक कोंडी होते. खेड बसस्थानकाची सध्याची जागा भाडेतत्वावर आहे, असे समजते. या स्थानकाची इमारत अतिशय धोकादायक व गैरसोयीची असल्याचे दिसून येत आहे, असे म्हटले आहे.
तसेच पत्रकार अनुज जोशी यांनी नवीन बसस्थानक उभारण्याच्या मागणीसाठी तीन वेळा लाक्षणिक उपोषणही केले आहे. तरीही आपण अधिकारी म्हणून यावर कोणतीही हालचाल करताना दिसत नाहीत.
यापूर्वी तात्पुरता वापर सुरू करण्याचे लेखी आश्वासन पत्रकार अनुज जोशी यांना दिले होते. मुंबई येथील मुख्य कार्यालयातून सुमारे सहा लाख रूपयांची निविदा देखील या कामासाठी काढण्यात आली होती. मात्र आजही या आश्वासनाची पुर्तता कुठेही झालेली दिसत नाही. त्यामुळे किमान नियोजित जागेवर चार तात्पुरते फलाट तात्काळ उभारून च पॉइंट सुरू करावा व बाहेरच्या डेपोच्या ज्या बस फेऱ्या भरणे येथून जातात त्या किमान या ठिकाणी आणून प्रवासी सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी संस्थापक अध्यक्ष नितिन जाधव, यांनी केली आहे