
मुंबई : मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात बंजारा समाजाचे नेतृत्व ॲड. पंडित राठोड, प्रा. बी. टी. चव्हाण सर, डॉ. मोहन चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी ग्राम विकास मंत्री श्री. गिरीश महाजन, महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ, श्री जितेंद्र महाराज यांच्यासह गोर बंजारा समाजातील असंख्य नागरिक उपस्थित होते.