रत्नागिरी : आजच्या बदलत्या ताण-तणावच्या जीवनशैलीमध्ये योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित योगा करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी केले.
जिल्हा प्रशासन रत्नागिरी, केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकार, जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार,परिविक्षाधीन आयएएस अधिकारी श्रीमती जास्मिन, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संघमित्रा फुले,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कऱ्हाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये योगा करणे फार महत्त्वाचे आहे. आरोग्य स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी सर्वांनी नियमित योगा करा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याने उत्तम प्रकारचे कार्यक्रमाचे नियोजन केले याबद्दल जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांचे कौतुक केले.
जिल्हा क्रीडा संकुल येथे अधिकारी कर्मचारी आणि शाळांमधील विद्यार्थी यांनी एक तास योगासने केली.