
रत्नागिरी : शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून मा.ना.उदयजी सामंत व किरण (भैय्याशेठ) सामंत यांचे मार्गदर्शनाखाली आज जि.प.आदर्श शाळा कसोप येथे युवासेना व शिवसेनेतर्फे शाळेतील व अंगणवाडीतील मुलांना खाऊ, वह्या व शालेय अभ्यास साहित्याचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाला युवासेना कसोपचे श्री.मनोजकुमार साळवी,नंद साळवी, मंदार साळवी, प्रशांत धुळप, प्रसन्न साळवी, श्रेयस साळवी, संतोष (बाबय) भिसे, किरण गुरव, तुषार गुरव माजी सरपंच मा. गिरिराज (बाबा) साळवी,राहुल साळवी, मुख्याध्यापिका श्रीम.मानसी बांदिवडेकर, उपशिक्षिका सौ.सारिका शिंदे, अंगणवाडी सेविका सौ.सविता साळवी, सुप्रिया साळवी ,सौ.दिक्षा माटल व पालक उपस्थित होते. शाळा सुरू झाल्याबरोबर लगेचच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने मुख्याध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शिवसेना व युवासेनेचे आभार मानले.