मुंबई-गोवा महामार्गाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध !,३० जूनपर्यंत या मार्गाची किमान एक बाजू तरी सुरू करण्याच्या बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचना

Spread the love


रायगड : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या प्रगती संदर्भात बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. याप्रसंगी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामाचा आढावा घेतला. अपूर्ण कामे जलद गतीने पूर्ण करून आमच्या कोकणवासीयांसाठी हा मार्ग लवकरात लवकर खुला कसा करता येईल यादृष्टीने तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या.

तसेच मुंबई गोवा महामार्गाच्या सध्या सुरू असलेल्या कामांच्या पॅकेज संदर्भातील आरोली ते काटे व काटे ते खेड येथील रस्त्यांचे काम काही प्रमाणात संथगतीने सुरू आहे, याबाबत नाराजी व्यक्त करत त्याबाबतची कारणे उपस्थित अधिकार्‍यांना विचारली. या कामांमध्ये तांत्रिक व आर्थिक निधीबाबतच्या ज्या अडचणी आहेत, त्या तातडीने दूर करून त्यावर कार्यवाही करण्यात येईल. परंतु ३० जूनपर्यंत या मार्गाची किमान एक बाजू तरी सुरू करण्यात यावी अशा सूचना चव्हाण यांनी केल्या.

त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याचे काम सुद्धा काही प्रमाणात झालेले असून, अपूर्ण कामे लवकर पूर्ण करून, कशेडी बोगद्यामधली किमान एक बाजू गणपतीपूर्वी वाहतूकीसाठी खुली करावी असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. पनवेल ते इंदापूर टप्प्यातील अपूर्ण असलेल्या कामांबाबत ज्या काही तांत्रिक अडचणी व निधीची कमतरता आहे त्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून गणपतीपूर्वी या मार्गाची एकेरी वाहतूक सुरू करावी, अशी अपेक्षा अधिकार्‍यांसमोर व्यक्त केली.
या सर्व मुद्द्यांवर आवश्यक उपाययोजना अंमलात आणून लवकरात लवकर मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल आणि कोकणवासीयांचा प्रवास सुखाचा होईल यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page