रत्नागिरी : तालुक्यातील धामणसें येथील रत्नेश्वर ग्रंथालयाला २०१४ मध्ये स्व. तात्यासाहेब अभ्यंकर रुग्णवाहिका दिली. या रुग्णवाहिकेने आतापर्यंत पंचक्रोशीतील अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. लवकरच नूतनीकरण केलेली आणि ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध देणारी रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत रुजू होणार आहे, अशी माहिती ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांनी दिली.
स्व. तात्यासाहेब अभ्यंकर यांनी आईच्या स्मरणार्थ ही रुग्णवाहिका रत्नेश्वर ग्रंथालयास १४ जून २०१४ रोजी दिली. त्यांच्या आईला वेळेत रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने तिला वैद्यकीय उपचारासाठी उशीर झाला होता .हे शहरामध्ये जर एवढा वेळ रुग्णवाहिका यायला लागतो तर ग्रामीण भागात अशी वेळ कोणावर येऊ नये या उदात्त हेतूने त्यांनी रुग्णवाहिका ग्रंथालयास दिला. वाचन संस्कृती वाढवणाऱ्या रत्नेश्वर ग्रंथालयाने या निमित्ताने रुग्णसेवाही केली. धामणसे पंचक्रोशीतील अपघात असो वा गरोदर माता किंवा विंचू, सर्प दंश झालेल्या रुग्णांना या रुग्णवाहिकेने तत्काळ रुग्णालयात दाखल केले जाते.
रत्नेश्वर ग्रंथालयाची बैठक १४ जून रोजी झाली. त्यामुळे रुग्णवाहिका नूतनीकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सात वर्षानंतर रुग्णवाहिकेचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या स्वरूपात लवकरच सेवेत रुजू होणार आहे. बडोदा येथील आणि सध्या कुवेत येथे वास्तव्यास असणारे रवींद्र कुळकर्णी यांनी धामणसेच्या श्री रत्नेश्वराच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी रत्नेश्वर ग्रंथालयास सदिच्छा भेट दिली. त्या वेळी रुग्णवाहिकेच्या नूतनीकरणासाठी मी लागणारा खर्च करतो, असे त्यांनी आश्वस्त केले. ग्रंथालयाच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाचा स्वीकार करून रुग्णवाहिका नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये ऑक्सिजन सुविधाही उपलब्ध व्हावी यासाठीही चर्चा झाली.हे काम पूर्ण लक्ष ठेवून चांगले करून घेण्यासाठी अतूल अशोक तुपे निवेंडी येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या दूखरेखी खाली करून घेण्यात येत आहे . ग्रंथालयाच्या सभागृहासाठी शंभर खुर्च्या घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. बैठकीला अध्यक्ष उमेश किशोर कुळकर्णी, चिटणीस मुकुंद जोशी,माजी सरपंच तथा उपाध्यक्ष विलास पांचाळ, उपसरपंच तथा संचालक अनंत जाधव, विश्वास धनावडे, प्रशांत रहाटे, सौ. स्मिता कुळकर्णी, ग्रंथपाल केशव कुळकर्णी, लिपिक अविनाश लोगडे आदी उपस्थित होते.
जाहिरात