वाशी (राहूल अहिरे) वाशी येथे कार्यरत असणारे रेल्वे पोलीस कर्मचारी श्री संभाजी कटारे यांच्या प्रसंगावधानामुळे एका 70 वर्षीय वृद्धेचे प्राण वाचले असून सदरची महिला ही रेल्वेच्या अपघातातून बालंबाल बचावली आहे.मात्र जीवाची पर्वा न करता स्वताचा जीव धोक्यात टाकून मदत करणाऱ्या श्री कटारे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सायंकाळी वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री संभाजी कटारे हे आपल्या वाशी येथील कार्यालयातून कर्तव्य बजावून संध्याकाळच्या दरम्यान वाशी ते घणसोली असा रेल्वेने प्रवास करीत होते.याच वेळी एक वृद्ध महिला लोकल डब्यात चढण्यासाठी धडपड करीत होती.मात्र ती महिला रेल्वेत चढत असतानाच लोकल सुरु झाल्यामुळे महिला पाय घसरुन स्थानकावर पडली.त्यामुळे या धडपडतील सदर महिलेचा मृत्यु डोळ्यासमोर असताना मात्र श्री संभाजी कटारे यांनी प्रसंगावधान राखून सदर महिलेला वाचविण्यासाठी जलद झालेल्या लोकलमधून उतरुन बाजूला केले आहे.आणि बाका प्रसंग टळला.
या घटनेनंतर या आजीने आपुलकीने श्री संभाजी कटारे यांना प्रेमाने जवळ घेवून अलिंगन दिले.या घटनेनंतर स्वताचा जीव धोक्यात घालून मदत करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री संभाजी कटारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.