अक्षय भालेरावच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही – डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे

Spread the love

नांदेड जिल्ह्यातील बोडार हवेलीला सिद्धार्थ हत्तीअबीरेंची सांत्वनपर भेट.

नांदेड – जून नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावात अक्षय भालेराव या बौद्ध युवकाची झालेली हत्या ही अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह आहे. हा खून खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून दोषींना कडक शासन व्हावे, शासनाने अक्षयच्या कुटुंबातील एका व्यक्तलास शासकीय सेवेमध्ये सामावून घेऊन त्यांचे पुनर्वसन करावे. भालेराव कुटुंबीयांच्या पाठीशी काँग्रेसचा अनुसूचित जाती विभाग खंबीरपणे उभा राहील, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांनी स्पष्ट केले.

सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी बोंढार हवेली येथे अक्षय भालेराव कुटुंबियांची भेट देऊन त्यांचे सांत्वन करत अक्षय भालेराव यांच्या मातोश्री व बंधू यांच्याकडे रोख दीड लाख रुपयाची मदत दिली.यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रफुल्ल सावंत, एससी विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर पवार, शहर-जिल्हाध्यक्ष (अनु. जाती.)मंगेश कदम,प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस श्रीमती अनिताताई इंगोले, प्रदेश सरचिटणीस सुमिती व्याळकर, नगरसेवक सोनाजीराव सरोदे, सुभाष काटकांबळे, मुदखेड तालुकाध्यक्ष संजय कोलते, महेंद्र गायकवाड, जिल्हा सरचिटणीस संजीवकुमार गायकवाड, प्रवीण वाघमारे, दिगंबर गायकवाड जिल्हा संघटक, उमरी तालुका अध्यक्ष दिनकर भंडारे, बिलोली माधव वाघमारे, लोहा तालुका मधुकर डाकोरे, नायगाव तालुका अध्यक्ष दत्तात्रेय आईलवर, हिमायतनगर तालुका अध्यक्ष संतोष आंबेकर, जिल्हा सचिव राहुल लोखंडे, जिल्हा सचिव पंडित वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष रामराव सोनसळे, कामाजी अटकोरे, भी. ना. गायकवाड, किशनराव रावणगावकर, आदी पदाधिकारी व लक्ष्मण कसले, आनंद कर्णे,अनिल सरपे, दिगंबर माने, दिपक पावले, बाळू राऊत, महेंद्र गायकवाड हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल सावंत यांनी केले तर आभार मुदखेड तालुका अध्यक्ष संजय कोलते यांनी केले. 

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page