‘मान्सून’ शब्द आला कुठून? ‘मान्सून’चे प्रकार माहीत आहेत का ?

Spread the love

सर्वजण मान्सूनची उत्सुकतेने वाट बघत आहे. ‘मान्सून’ हा शब्दही रोजच्या वापरातील झाला आहे. बऱ्याच लोकांना मान्सून म्हणजे पाऊस हा अर्थ वाटतो. परंतु, मान्सून हा शब्द मुळात आला कुठून आणि त्या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे, हे जाणून घेणे रंजक ठरेल.

मान्सून म्हणजे काय ?

मान्सून हा शब्द अरेबिक भाषेतून आला आहे . ‘मौसीम’ (mausim) या मूळ शब्दापासून मान्सून हा शब्द निर्माण झाला आहे. मौसीम म्हणजे मोसमी वारे. Encyclopedia of Paleoclimatology and Ancient Environments यात दिलेल्या अर्थानुसार, मान्सून हा शब्द अरबी शब्द ‘मौसीम’ वरून आला आहे, ज्याचा अर्थ वाऱ्यांचा हंगाम असा आहे. हा शब्द हिंद महासागर, अरबी समुद्र आणि आसपासच्या किनारी प्रदेशातील वाऱ्यांच्या दिशेसाठी मान्सून हा शब्द वापरण्यात येतो. हे मान्सून वारे मे ते ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंतच्या कालावधी नैऋत्येकडून आणि इतर वेळी ईशान्येकडून वाहतात. याला मौसमी वारे असेही म्हणतात. परंतु, आशियाई किनारी प्रदेशांमध्ये मान्सून या शब्दाचा अर्थ पावसाळा या अर्थी वापरतात. बंगालच्या उपसागरातून आणि नैऋत्येकडील अरबी समुद्रातून वाहणाऱ्या मोठ्या मोसमी वाऱ्यांचा संदर्भ देण्यासाठी ब्रिटीश भारत आणि शेजारील देशांमध्ये हा शब्द पाऊस या अर्थी वापरत. जगातील प्रमुख मान्सून प्रणालींमध्ये पश्चिम आफ्रिकन, आशिया-ऑस्ट्रेलियन, उत्तर अमेरिकन आणि दक्षिण अमेरिकन मान्सून यांचा समावेश होतो.

मान्सून शब्दाच्या व्युत्पत्ती

मान्सून या शब्दाची तीन प्रकारे सांगता येते. एक इंग्रजीमधील monção या शब्दावरून मान्सून शब्द आला, असे म्हटले जाते. monção म्हणजे पावसाळा, पावसाळ्याच्या आधी वाहणारे वारे. मान्सून हा शब्द अरेबिक भाषेतील मौसीम या शब्दावरून आला असण्याची शक्यता आहे. त्याचाही अर्थ मोसमी वारे असाच होतो. डच भाषेतही मॉन्सून हा शब्द आढळतो.

मान्सूनचे कार्य

मोसमी पाऊस तसेच मोसमी वारे यांना मान्सून म्हणून ओळखले जाते. हिंद महासागर आणि अरबी समुद्रावर सहा महिने उत्तर-पूर्वेकडून आणि उर्वरित सहा महिने नैऋत्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचे वर्णन करण्यासाठी नाविकांनी ‘मौसीम’ हा शब्द वापरला. ‘सायन्सडिरेक्ट’ जर्नलच्या मते, सर्वसाधारणपणे, दोन्ही गोलार्धात उन्हाळी हंगामात मान्सूनचे वारे सर्वाधिक वाहतात. मान्सून वारे पूर्व आशिया, दक्षिण आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागातही वाहतात. अलीकडेच उत्तर अमेरिका खंडाच्या नैऋत्य भागांमध्येही मान्सून वाऱ्यांची नोंद झाली.

मान्सूनचेही दोन भाग पडतात. एक जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणारा पाऊस आणि दुसरा डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात पडणारा पाऊस. ‘सायन्सडिरेक्ट’च्या मते, जून ते सप्टेंबर या काळात पडणाऱ्या पावसाला ‘उन्हाळी पावसाळा’ म्हणतात आणि डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत पडणारा पाऊस हा ‘हिवाळी पावसाळा’ असतो. काही देशांमध्ये उन्हाळा आणि हिवाळा हे मुख्य ऋतू असून, पावसाळा हा ठराविक वेळेपुरता पडणारा पाऊस म्हणून ओळखला जातो.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page