👉🏻 प्रवाशांचा सवाल…!
💥 संगमेश्वरातील प्रवाशी असुविधांमुळे त्रस्त..
▪️संगमेश्वर :- कोकण रेल्वेची स्थापना होऊन काल 24 वर्षे झाली. पण या 24 वर्षांच्या कालावधीत संगमेश्वर रोड स्थानकाच्या सुविधेसाठी रेल्वेने 24 कामे तरी नीट केली का? असा प्रश्न संगमेश्वर रोड येथील जनता विचारत आहे. या स्थानकात प्रवाशांच्या मूलभूत सुविधेचीही वानवा आहे.
▪️स्थानकातील फलाट क्रमांक 2 वर पिण्याच्या पाण्याची पाणपोई आहे. ती सुद्धा नादुरूस्त. पाणपोईला नळ आहेत, पण त्या नळांना पाणीच येत नाही. फलाट क्रमांक 2 वर रत्नागिरी दिशेला एक निवारा शेड आहे, ती फक्त नावा पुरतीच आहे. त्यामध्ये प्रवाशांना अथवा जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसन नाही.
▪️फलाट क्रमांक एकवर काही ठिकाणी पेवर ब्लॉक खूप खचले आहे आणि ते लवकरच दुरुस्त करून देऊ असे रेल्वे रिजनल मॅनेजर रवींद्र कांबळे यांनी दिनांक 15 जून 2022 रोजी आम्हाला त्या संदर्भात पत्र दिले. परंतु त्या गोष्टीलाही आज 7 महिने झाले. पण अजूनपर्यंत काहीच काम झालेलं नाही.
▪️संगमेश्वर रेल्वे स्थानकामधून प्रवाशांकडून करोडो रुपयांचा महसूल मिळतो, पण कोकण रेल्वे सुविधा काय देते, असे पत्रकार संदेश जिमन यांनी सांगितले आहे.
▪️संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात अगोदर आरक्षण केंद्र होते, कोरोना काळानंतर ते बंद केले ते आजपर्यंत सुरू करण्यात आलेले नाही. ते आरक्षण केंद्र कुठे आहे? याचा प्रवाशांना प्रश्न पडतो. आरक्षण कुठे केले जाते हे प्रवाशाना समजत नाही, असे येथील प्रवासी म्हणत आहेत.