तुझा लवकरच दाभोळकर होणार म्हणत शरद पवारांना आली जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

Spread the love

मुंबई- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून शरद पवारांना हि धमकी देण्यात आली आहे.या पोस्टवर पोस्टकर्त्याचं नाव नर्मदाबाई पटवर्धन असं आहे. ‘शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार’, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली आहे. तर सौरभ पिंपळकर याने ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकी दिली आहे. ‘आयुष्यभर सुपारी कात्रत खाल्ल्यामुळे औरंगजेबाच तोंड मरताना वाकडं होऊन मेलं म्हणते हे खरं आहे का? असं असेल तर इतिहास पुनरावृत्ती करणार म्हणजे..’, अशी धमकी सौरभ पिंपळकर या ट्विटर अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे.

तो भाजपचा कार्यकर्ता?
सौरभ पिंपळकर या नावाने असलेल्या ट्विटर अकाऊंटवर ही व्यक्ती अमरावतीची असल्याचं म्हटलं आहे. तसेच भाजपचा कार्यकर्ता असल्याचंही त्याच्या अकाऊंटवर नोंदवलेलं आहे. मात्र, हे अकाऊंट ओरिजिनल आहे की फेक आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सुप्रिया सुळे यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
दरम्यान, शरद पवार यांना धमकी आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी या दोन्ही धमक्यांची माहिती पोलीस आयुक्तांना दिली. तसेच संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधला.

धमकी देणे दुर्देवी
शरद पवार यांना आलेल्या धमकीप्रकरणी सुप्रिया सुळेंकडून मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशा धमक्या आल्या असतील तर गृहमंत्रालयाने याची तातडीने दखल घ्यावी. शरद पवारांना धमकी येणं दुर्दैवी आहे. राजकारणात मतभेद जरुर असतात. मात्र, इतक्या खालच्या स्तरावर जाऊ नये, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

कोणीही असेल कारवाई करा
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धमकी देणे हे आमच्या रक्तात नाही. जो कुणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या धमकी प्रकरणावर दिली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page