
कोकण (शांताराम गुडेकर )
पावसाचे आगमन गेले तीन -चार दिवस होत असल्यामुळे शेतक-यांच्या आशा पालवीत झाल्या आहेत.या वर्षी ७ जून लाच पावसाने आपले अस्तित्व दाखविल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.यामुळे ग्रामीण भागातील शेतक-यांनी आपल्या जवळ असलेल्या बैल जोडीच्या मदतीने भात पेरणी करण्यासाठी सुरुवात केली आहे.

पावसाळ्याचा हंगाम सुरु होत असल्याने शेतकरी पेरणीची जोरदार तयारीला लागलेला असल्याचे दृश्य रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील श्री क्षेत्र मार्लेश्वर पासून जवळच असलेल्या मु.पो.आंगवली -रेवाळेवाडी या ठिकाणी पहावयास मिळत आहे.

