▪️साखरपा दि. २७ :- संगमेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोंडगाव येथे प्रजाकसत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोंडगावच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच प्रियांका जोयशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी साऱ्या परिसरात नवचैतन्य पसरले होते.
▪️यावेळी साखरपा नं १ शाळेचे विद्यार्थी व पद्मा कन्या शाळेच्या विद्यार्थिनी व दोन्ही शाळेचे शिक्षक वृंद ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
▪️यावेळी राष्ट्रगीत म्हणून ध्वजाला सलामी व मानवंदना देण्यात आली. यावेळी माजी सरपंच बापू शेट्ये व माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यानंतर ग्रामसभा घेण्यात आली व पहिल्या सभेतच कोरम पूर्ण झाला व ग्रामसभेचे कामकाज सुरू झाले.