
दिव्यातील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी लोकांच्या गर्दीने मुख्यमंत्री भारावले
दिवा (सचिन ठिक)- एक बार मैने कमिंटमेंट किया तो मै खुदकी भी नही सुनता हुँ…अशी डायलांग बाजी करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यातील विकासकामांसाठी भविष्यातही भरभरुन निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. दिव्यात झालेली नागरिकांची प्रचंड गर्दी पाहून मुख्यमंत्री भारावून गेले.दिव्यातल्या लोकांचा प्रेमाचा महासागर या ठिकाणी लोटलेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा महीला होत्या,लहान मुलं होती,तरुण होते.ज्येष्ठ होते.ज्या पद्धतीने स्वागत त्यांनी माझं केलं ते डोळ्याचं पारणं फिटणार स्वागत असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. त्यांनी नागरिकांचे भर कार्यक्रमात आभार मानले.आज दिव्यात विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भुमीपुजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिजिटल स्वरुपात पार पडला.यावेळी ते बोलत होते.यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मला अभिमान वाटतोय की,दिव्यात मागणी केल्याप्रमाणे या दिव्यामध्ये पाणीपुरवठ्यासाठी 240 कोटी, दिवा प्रभागातील विविध रस्त्यांसाठी 132 कोटी रुपये, दिवा आगासन रस्त्यासाठी 63 कोटी रुपये, वारकरी भवनसाठी 15 आणि अतिरीक्त 15 असे 30 कोटी रुपये, देसाई खाडी पुलाला 67 कोटी रुपये, दिव्यातील आगासन येथील दवाखान्याच्या भुसंपादनाला 58 कोटी रुपये मंजूर, दातिवली तलाव सुशोभिकरणासाठी 22 कोटी रुपये, खिडकाळेश्वराचे प्राचीन मंदीरासाठी 10 कोटी, काँक्रीटच्या 145 कोटी रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात विकासांची कामे सुरु आहेत.
दिवेकरांच्या प्रेमामुळे मुख्यमंत्री भारावले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजभवनातील कार्यक्रमाला हजर व्हायचे होते.परंतु दिव्यात झालेल्या प्रचंड गर्दीमुळे त्यांना सदरचा कार्यक्रमा सोडावा लागला.त्यांना राजभवनमध्ये पालकमंत्री संभुराज देसाई यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये राजभवनमध्ये कार्यक्रम पार पडणार होता.मात्र दिवेकरांची प्रचंड गर्दी आणि स्वागताने स्वागताने मुख्यमंत्र्याला दिव्यातील कार्यक्रमाला थांबावे लागले होते.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हेच खरे वैभव आहे. ऐश्वर्य आहे.हा मुख्यमंत्री देखील तुमच्यातला एक सर्वसामान्य कार्यकर्ताच आहे.आदरणीय शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने प्रेरित झालेला आहे.यामुळे आनंद दिघे यांच्या सानिध्यात,मार्गदर्शनाखाली काम केलेल्या कार्यकर्त्या आहे.आणि म्हणून आपल्या प्रेमापुढे जावू शकत नाही.असे म्हणून दिवेकर नागरिकांना त्यांनी धन्यवाद दिले.
पोलीस स्टेशन,सुपरस्पेशालिस्ट हाँस्पीटल आणि बरंच काहींसाठी निधी देण्याचे आश्वासन
मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवेकर नागरिकांसाठी भविष्यातही मोठा निधी देण्याचे भर कार्यक्रमात सांगितले आहे.त्यांनी सांगितले की, मुंब्रा फायरब्रिग्रेड, दिवा शिळरोड, नँशनल स्कूलपर्यंत डिपीतला रस्त्याचं बांधकाम करण्यासाठी 470 कोटी, दिवा शहरामध्ये 100 बेडचं सुपर स्पेशालिस्टचं दवाखाना उभारणे आणि त्याचबरोबर दिवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी देखील 4 कोटीं, तसेच दिव्यात स्वतंत्र पोलीस स्टेशनसाठी 5 कोटी रुपये इतका निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी खासदार डाँ.श्रीकांत शिंदे हे शिफारस करणार आहेत.
एक बार कमिंटमेंट कीया तो मै खुद की भी नही सुनता…मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर कार्यक्रमात सांगितले की,हा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे.ते म्हणाले की,ही एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो. एक बार मैने कमिंटमेंट कीया तो मै खुद की भी नही सुनता… आपल्याला डंपिंग हटविण्याचा शब्द दिला होता.या दिव्यातला डंपिंग हटवून दाखविलं. क्लस्टरचा शब्द..जसं ठाण्याचं क्लस्टर योजनेचा परवा आम्ही भुमीपूजन केलं.भुमीपूजन नुसतं केल नाहीत तर कामाला सुरवात देखील करुन दिली आहे.दिव्यात देखील इमारती आहेत.या इमारतीवरती टांगती तलवार आहे.भविष्यात अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसण्याचं काम देखील हा एकनाथ शिंदे करेल. उद्यान, मैदान, दवाखाना या सगळ्या गोष्टी आपल्या आवश्यक आहेत. मी आपल्या एवढंच सांगेन स्वतंत्र पोलीस स्टेशन आवश्यक आहे.हे या ठिकाणी बांधलं जाईल आणि यासाठी ५ कोटींचा निधी देखील दिला जाईल.आयुक्तांना सांगितलंय जागादेखील तातडीने शोधा.आणि तातडीने कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम आवश्यक आहे.
या सोहळ्याच्या लोकार्पण सोहळ्यास खासदार श्रीकांत शिंदे,माजी महापौर नरेश म्हस्के,माजी उपमहापौर रमाकांत मढवी,महापालिका आयुक्त अभिजीत बांगर,जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदींसह दिवा शहरातील सर्व माजी नगरसेविक आणि नगरसेविका तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.