👉🏼देव, घैसास,कीर महाविद्यालयात मतदार दिन कार्यक्रम
▪️रत्नागिरी-भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय व महाविद्यालय निवडणूक साक्षरता मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. मतदार दिनानिमित्त यावेळी शपथ घेण्यात आली.
▪️या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह उपस्थित होते. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आपल्या मनोगतून सांगितले की, एक जागरूक नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकांनी मतदान करणे गरजेचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत मतदानाचे महत्व पटवून दिले, हेे महत्व इतरांनाही पटवूून द्या असे आवाहन जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी केले.
▪️यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पाेलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी , विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीचे सचिव ए.एन कुलकर्णी , निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड , प्रांतधिकारी विकास सूर्यवंशी , तहसीलदार शशिकांत जाधव, संस्थाध्यक्ष नंदकुमार साळवी, संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. नमिता कीर, माजी कार्याध्यक्ष दिनकर पटवर्धन, उपकार्याध्यक्ष डाॅ.श्रीराम भावे , कार्यवाह सुनिल उर्फ दादा वणजू, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ.वसुंधरा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
▪️कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गायकवाड यांनी केले यानंतर मैं हू भारत हे गीत प्रसारण करण्यात आले.
जिल्ह्यामध्ये मतदार नावनाेंदणी प्रक्रियेत उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. साक्षरता क्लब नाेडल आयकॉन्सचा यावेळी सत्कार करण्यात आला.
▪️महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा, रांगोळी स्पर्धा , चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धेचे आयाेजन केले हाेते. या स्पर्धेचे विजेत्या विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनघा निकम- मगदूम यांनी केले.