
मुंबई (शांताराम गुडेकर )

जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधत गांधी नगर येथे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष वारंग यांच्यावतीने वृक्ष रोपण व पर्यावरण रक्षणासाठी सदा कटिबध्द राहण्यासाठी शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पर्यावरण मध्ये होणारे सततचे बदल आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम लक्ष्यात घेत अधिकाधिक झाडे लावणे हाच पर्यावरण वाचवण्यासाठी पर्याय असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष वारंग म्हणाले. यावेळी रिक्षाचालक व नागरिकांना वृक्ष वाटप केले तसेच वाहतूक विभागाच्या कार्यालयात देखील वृक्ष रोपण करण्यात आले.