✒️ जनशक्तीचा दबाव न्यूज
🛑 चिपळूण | जानेवारी २९, २०२३.
▪️ चिपळूण एकता विकास मंच यांच्यावतीने चिपळूण शहरातील परांजपे मोतीवाले हायस्कूल येथे मोफत भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ आमदार शेखर निकम यांच्या हस्ते तर श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष श्री. सिद्धेश लाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले.
▪️ यावेळी यशस्वी उद्योजक श्री. वसंतशेठ उदेग, एकता विकास मंचचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, एकता विकास मंच कार्याध्यक्ष श्री. शिरीष काटकर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालिका सौ. दिशाताई दाभोळकर, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. बाबुशेठ तांबे, श्री. केशवराव कुंभार, श्री. राजूभाई जाधव, एकता विकास मंचचे श्री. राज शेठ खेडेकर, श्री. हेमंतशेठ शिरगावकर, माजी नगरसेविका सौ. सईताई चव्हाण, श्री. आशिष खातू, श्री. विजय चितळे, खालिदभाई दाभोळकर, अविनाश हरधारे, सौ. पुनम भोजने, सौ. सफाताई गोठे, श्री. सुहास चव्हाण, श्री. मल्लेश लकेश्री आदी उपस्थित होते.