
▪️देवरूख: ताम्हाणे येथील कातळवाडी व कुळये वाडी येथे युवा कार्यकर्ते अमोल गायकर यांनी भारत देशाचे आदरणीय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पेतून असलेले श्रमिक कष्टकरी कामगार वर्गासाठी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट मिळावा यासाठी ई- श्रम कार्ड संदर्भात मोफत नोंदणी करून २ लाखाचा विमा प्राप्त करून दिला तसेच ई-श्रमकार्डचे वाटप केले.यावेळी उपस्थित ताम्हाणे ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सदस्या सौ. शितल तटकरे , प्रियांका कानसरे, दर्शना शिगवण याही उपस्थित होत्या आता ताम्हाणे गावातील इतर वाड्यामध्ये पुढील आठवड्यात या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कॅम्प आहे असेच दर आठवड्याला एक दिवस हे अभियान चालू आहे. मुख्य म्हणजे अनेक महिला कष्टकरी कामगार वर्ग असल्याने दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी साडेपाचला कामावरून घरी येतात त्यांच्या समस्या समजून त्यांच्या सवडीनुसार श्री.गायकर हा कॅम्प भरवितात.

▪️१ मे २०२३ पासून आठवड्यातील एक दिवस राष्ट्रसेवा, जनसेवा या धर्तीवर ताम्हाणे येथील युवा कार्यकर्ते अमोल गायकर यांनी शासनाच्या विविध योजना मोफत ताम्हाणे गाव तसेच ताम्हाणे पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी सुरु केल्या आहेत. यामध्ये ई-श्रमकार्डच्या नोंदणी करिता विविध बचतगटातील महिलांनी सहभाग घेतला तसेच यावेळी उपस्थित महिला वर्गाला योजनेची पूर्ण माहिती दिल्यानंतर अभियान लाभार्थी महिलांनी श्री.गायकर यांचे आभार मानले. यापुढे केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांच्या लाभदायक योजना मोफत जनतेपर्यंत पोहचवून लाभ मिळवून देणार तसेच आठवड्यातून एक दिवस मोफत सेवा या धोरणातून राष्ट्रसेवा अभियान असेच अखंड या ताम्हाणे नागरिकांसाठी प्रत्येक गावातील नागरिकांसाठी चालू ठेवणार हा संकल्प आहे.
