
संगमेश्वर दि 4 ( मकरंद सुर्वे संगमेश्वर ) संगमेश्वर तालुक्यातील राजीवली ग्रुप ग्रामपंचायतचे भाजपाचे सरपंच उपसरपंच यांच्यावर केलेली कारवाई ही राजकीय सुडापोटी केलेली कारवाई असे भाजपा उपाध्यक्ष सूर्यकांत साळुंखे यांनी सांगितले.
धामणी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राजीवली ग्रामपंचायतीचे भाजपाचे सरपंच प्रशांत शिर्के आणि उपसरपंच सचिन पाटोळे यांच्यावर केलेली कारवाई ही सूडबुद्धीने केली आहे. ज्यांना हार पचवता येत नाही त्यांनी ग्रामपंचायतीबाबत कारभाराबाबत बोलू नये . राजकारणामध्ये हार आणि जीत ही ठरलेली असते मात्र ज्यांना पराभव पचनी पडत नाही अशांनी राजकारणामध्ये पडू नये त्यांनी संन्यास घ्यावा असा टोला राजीवली ग्रुप ग्रामपंचायत मध्ये पराभूत झालेल्यांना श्री साळुंखे यांनी लगावला.
राजीवली ग्रामपंचायतीचे भाजपाचे सरपंच प्रशांत शिर्के आणि उपसरपंच सचिन पाटोळे यांच्यावर केलेली कारवाई ही सूड भावनेतून केलेली असून आपण याबाबत अधिक माहिती घेतली आहे. पाखाडीच्या कामाचे बिल काढण्याकरिता सरपंच उपसरपंच यांनी पैसे मागितले हा केवळ बनाव करण्यात आला असून, या कामाचे असलेले ठेकेदार यांची याबाबत फिर्यादच नसल्याची माहिती देखील सूर्यकांत साळुंखे यांनी यावेळी पत्रकारांना दिली. तसेच सरपंच आणि उपसरपंच यांच्याविरुद्ध एसीबी कडे तक्रार करणारा तुकाराम येडगे हा ग्रामपंचायतीचा ठेकेदारही नाही असे त्यांनी सांगितले
सरपंच प्रशांत शिर्के हे थेट सरपंच म्हणून जनतेतून निवडून आले आहेत आणि जनमताने कौल दिला आहे. आणि त्यांच्यासमोर उभे असलेले हे पराभूत झाल्याने ते आता सरपंच, उपसरपंच आणि विरोधात कारस्थाने रचत आहेत. आणि या कारस्थानाचा एक भाग म्हणून सरपंच उपसरपंच त्याला बळी पडले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे त्यांच्यावर सध्या आरोप असले तरी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आणि न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. यातूनच सत्य जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही. कितीही कोणीही वल्गना केल्या तरी देखील सरपंच उपसरपंच राजीनामा देणार नसल्याची ठाम भूमिका भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत साळुंखे यांनी पत्रकार परिषद शेवटी स्पष्ट केले.