🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज
🛑 रत्नागिरी | जानेवारी २९, २०२३.
▪️ भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा पंधरवड्याचे औचित्य साधून आयक्यूएसी विभाग, मराठी विभाग व कोकण मराठी साहित्य परिषद मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘काव्यमंच’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
▪️ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांनी उपस्थित कवी मंडळाचे शाल, श्रीफळ, पुष्प देऊन स्वागत केले. कवी अरुण मोर्ये, अमेय धोपटकर, श्वेता केळकर, वेदांत जोशी यांनी माणूसपण, प्रेमभाव, निसर्ग सौंदर्य, मराठी मायबोली इत्यादी विषयांवर आपल्या कविता सादर केल्या.
▪️ संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. नमिता कीर यांनी कविता लेखन संदर्भात मार्गदर्शन करताना कविता ही साध्या, सोप्या शब्दात आपल्या भावना व्यक्त करणारी असावी, म्हणजे वाचकाला ती उमजते, आवडते असे सांगितले. यावेळी उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, मराठी विभागप्रमुख सौ. अनन्या धुंदूर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.