श्री क्षेत्र वेरूळ येथे वीर शैव कक्कया समाजाच्या वतीने दोन दिवसीय मार्गदर्शन शिबीर संपन्न…

Spread the love

मुंबई (शांताराम गुडेकर )
वीर शैव कक्कया समाज सेवा मंडळ,वेरूळ,ता. खुलताबाद यांनी श्री क्षेत्र वेरूळ येथे इयत्ता ८वी ते १०वीच्या विध्यार्थीसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करून स्थानिक व समाजातील विचारवंत यांना निमंत्रित केले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.भोलेनाथ गणपतराव मुने, श्री.डॉ. पाटणी, श्री.जितेंद्र तांदळे, श्री.दिलीप नारद (पी.एस.आय ),श्री.सूर्यकांत इंगळे (सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी महासंघ )तसेच विशेष निमंत्रित श्री पंकज पाटेकर,श्री किरण नरहिरे,सौ रंजना शिंदे,सौ.ज्योती इंगळे,श्री.सुरेश खरात, तसेच निमंत्रित शिक्षक श्री.लक्ष्मण जाधव,श्री.अमोल भगवान सोनटक्के, श्री.कचरू डहाके,श्री. सुरेश त्रिबके व इत्तर शिक्षक उपस्थित होते.

शनिवारी सकाळी श्री वीर शैव संत कक्कया महाराज यांची प्रतिमा पूजन तसेच द्विपप्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी श्री पुंडलिक वाघ (गुरुकुल चालक )यांनी विदयार्थाची शैक्षणिक वाटचाल व शिक्षण पद्धती तसेच श्री दिलीपराव भिवाजी नारद साहेब (पो. नि.)यांनी शिक्षण व संस्कार यावर बहूमोलाचं मार्गदर्शन केले. तसेच सूर्यकांत इंगळे यांनी विद्यार्थी शिक्षण व उद्योग यावर सविस्तर ज्ञान दिले.


श्री भोलेनाथ गणपतराव मुने यांनी सामाजिक उत्कर्ष व शिक्षणाचे महत्व विषद केले.श्री दिलीप इंगळे यांनी शिक्षणातील नवोदय विद्यालयाचे महत्व व शिक्षण यावर उपयुक्त माहिती दिली. ऍड. सर्जेराव साळवे यांनी समाज प्रबोधन व भविष्यातील शिक्षण यासह संविधानाचे महत्व सांगितले. श्री शरद बापूराव इंगोले यांनी आजच्या युगातील व्यवसाय व उद्योजकता या विषयावर सखोल ज्ञान दान केले.रविवारी सकाळी श्री वीर शैव संत कक्कया महाराज प्रतिमा पूजन आणि द्विपप्रज्वलीत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. ह. भ. प. श्री नारायण महाराज कोरडे यांनी पर्यावरण व सामाजिक जीवन या अंतर्गत श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ व मनुष्य जीवनावर उत्तम असे विवेचन केले.

ह. भ.प श्री भाऊसाहेब महाराज वाकळे यांनी समाज जीवन व जीवनातील कुशलता यावर उत्तम विचार प्रकट केले. श्री विलास नारायने यांनी शिक्षण व सामाजिक सहकार्य हिच प्रगतीची दिशा असे विचार दिले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अति सुंदर स्वरूपात वि. क. स. सेवा मंडळाचे सचिव श्री अशोक पाटेकर यांनी मोठया कुशलतेने करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. मंडळाचे अध्यक्ष राधाकिसन सोनाजी त्रिबके यांनी आपले सामाजिक विचार प्रगट करून उपस्थित मान्यवर व समाज बांधवाचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली.यावेळी श्री दादाराव खाटीकमारे, श्री अशोक खाटीकमारे, श्री संदीपान पाटेकर, श्री सोमनाथ इंगळे, श्री महादेव इंगोले आणि श्री माणिकराव सोनटक्के आदी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page