
सोलापूर– दुधाचे दर पूर्ववत करण्यासाठी सोलापूर -पुणे महामार्गावर दूध रस्त्यावर ओतून शेतकरी आंदोलन करत आहेत.महामार्गावर आंदोलन सुरु असल्यामुळे कांही वेळ वाहनांच्या रस्त्यावर रांगा लागून वाहतूक खोळंबल्याचं चित्र दिसून आलं होतं.मात्र,पोलीसांनी आंदोलकांना बाजूला सारत वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान सरकारने लक्ष घालून तात्काळ दुधाचे दर वाढवावेत अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. वाढलेली महागाई, चाऱ्याचे दर, जनावरांचा खुराक, शेतीमुळे होत असलेली अपदा यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून दूधामध्ये उत्पादन मिळत असल्याने तो फक्त दूधाच्या पैशांवर घराचे आर्थिक गणित सुरळीत करत असतो. मात्र,दुधाचे भाव कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
अशात पुन्हा दुधाचे भाव पुर्वरत व्हावे यासाठी दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला असून दुधाला भाव मिळावा यासाठी आंदोलन करत आहे. याचाच भाग म्हणून दुधाचे दर पूर्ववत करण्यासाठी सोलापूर -पुणे महामार्गावर दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांनी आज आंदोलन केले.