🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज
🛑 लांजा | जानेवारी २९, २०२३.
▪️ तालुक्यातील खानवली येथील करंबेळीवाडी येथील पाटकर प्राॅडक्टसच्या नवीन वास्तूचा उद्घाटन समारंभ सोमवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता ज्येष्ठ उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत यांच्या शुभहस्ते होणार आहे.
▪️ यावेळी आत्मा रत्नागिरी प्रकल्प उपसंचालक उर्मिला चिखले, प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, पीएमएफएमई नोडल अधिकारी अनिल रोकडे, तालुका कृषी अधिकारी सविता मेहेर, कृषी अधिकारी सुभाष गुरव, पाटकर प्राॅडक्टस सर्वेसर्वा सौ. मंजिरी पाटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नूतन वास्तुच्या उद्घाटनानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
▪️ सौ. मंजिरी पाटकर यांच्या सासूबाई सुनंदा पाटकर व सासरे नाना पाटकर यांनी सुरु केलेला घरगुती व्यवसाय त्यांनी पुढे चालवत त्याचा विस्तार वाढविला. आपल्या ग्राहकांना दर्जेदार आणि आरोग्यदायी उत्पादन देणे हे पाटकर प्रॉडक्ट्स च पाहिले उद्दिष्ट आहे. जास्तीत जास्त स्वतः तयार केलेले मसाले, स्वतः बनवलेले पदार्थ वापरणे आणि उत्पादनाचा दर्जा कायम दर्जेदार ठेवणे यासाठी पाटकर प्रॉडक्ट्सची उत्पादने ओळखली जातात.
▪️ सन २०१८ मध्ये घरगुती उत्पादने चालू करून सुरु केलेला व्यवसाय आज त्यांनी नावारूपाला आणला सध्या त्यांच्याकडे विविध प्रकारची लोणची, काळी मिरी , दालचिनी दालचिनी पावडर, मोरावळा, तिळकूट, मेतकूट, गोड कोकम, आंबे हळद पावडर, आंबा पोळी, फणस पोळी, पाचक , गरम मसाला ,कोकम, कोकम सरबत, आगळ, तळलेले गरे ,सांडगी मिरची , पोहा, बटाटा पापड, विविध प्रकारची कोकणी पीठे अशी ३३ प्रकारची उत्पादने त्यांच्याकडे घाऊक व किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत उद्योगाला अर्थसहाय्य पुरविण्यात आले. त्यासाठी शेखर विचारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. बँक ऑफ इंडियाने यासाठी वित्त पुरवठा केला. प्रजासत्ताक दिनी तालुका कृषी विभाग लांजा यांच्यातर्फे उदयोन्मुख महिला उद्योजिका पुरस्काराने सौ. मंजिरी पाटकर यांचा सन्मान केला.